टेनिस स्पर्धेत शेख, साळवीचे विजय

पुणे – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) आयोजित व आयटीएफ आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए आयटीएफ वरिष्ठ एस 100 टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत रमझान शेख, दशरथ साळवी या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला.

डॉ. जी. ए. रानडे टेनिस सेंटर, मुंबई येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत 35 वर्षांवरील पुरुष एकेरी गटात रमझान शेखने दुसऱ्या मानांकित रुपजीत भरालीचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला.

अव्वल मानांकित विशाल बद्री व चौथ्या मानांकित आकाश काळे यांनी दर्शन गुप्ता व रोहित साने यांचा 6-0, 6-0 अशा सारख्याच फरकाने पराभव केला.

45 वर्षांवरील गटात दशरथ साळवीने दुसऱ्या मानांकित बुलबुल दासचा 6-0, 6-0 असा सहज पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. अव्वल मानांकित नितीन कीर्तने याने संदीप भरुचाचे आव्हान 6-1,6-0 असे मोडीत काढले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.