मोदींच्या दुसऱ्या शपथविधी सोहळ्यातही शेख हसीना राहणार अनुपस्थित 

ढाका -भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या शपथविधी सोहळ्यालाही बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना मुकावे लागणार आहे. परदेश दौऱ्यामुळे हसीना मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नसल्याचे बांगलादेश सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मोदी 30 मे यादिवशी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, हसीना त्यादरम्यान जपान, सौदी अरेबियासह तीन देशांच्या पूर्वनियोजित दौऱ्यावर असतील. त्यांच्या ऐवजी बांगलादेश सरकारमधील सर्वांत वरिष्ठ मंत्री ए.के.एम.मुझम्मिल हक मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील. मोदी यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्यावेळीही हसीना परदेश दौऱ्यावर होत्या. त्यावेळी संसदेच्या सभापतींनी बांगलादेश सरकारचे प्रतिनिधित्व केले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here