शेहनाझ गिल मुंबई सोडणार

सिद्धार्थ शुक्‍ला 2 सप्टेंबर रोजी हे जग सोडून गेला. त्या धक्‍क्‍यातून शेहनाझ गिल फार कष्टानेच सावरू शकली होती. त्यानंतर केवळ “होसला रख’ या आगामी सिनेमाच्या कामासाठीच ती मुंबईमध्ये राहिली होती. 

या सिनेमाचे प्रमोशन करण्याची जबाबदारी तिच्याकडे होती. मात्र, आता शेहनाझ गिलने मुंबईला कायमचा रामराम करायचा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे. तिच्या अलीकडच्या काही व्हिडिओमधून तरी तसेच सूचित केले जाते आहे. 

अगदी अलीकडच्या एका व्हिडिओमध्ये तर शेहनाझने मुंबई कायमची सोडण्याची पूर्ण तयारी केली असल्याचे वाटते आहे. मात्र, हे पूर्ण सत्य नाही. केवळ अफवा आहेत, असेही समजते आहे. अलीकडेच दलजीत दोसांज, सोनम बाजवाबरोबर शेहनाझबरोबर “होसला रख’च्या प्रमोशनचे व्हिडिओ यूट्यूब चॅनेलवर अपलोड झाले आहेत.

 यामध्ये शेहनाझ अगदी आनंदी दिसते आहे. तिच्या चेहऱ्यावर तणाव आणि दुःख दिसत नाही. मात्र, ती कसला तरी खोल विचार करते आहे, हे मात्र स्पष्ट दिसते आहे. सिद्धार्थ शुक्‍ला आणि शेहनाझ गिल “बिग बॉस 13’मध्ये भेटले होते. थोड्याच काळात त्यांची मैत्री प्रेमात परिवर्तीत झाली होती. या वर्षी डिसेंबरमध्ये दोघे लग्न करणार होते. मात्र, त्यापूर्वीच सिद्धार्थ हे जग सोडून गेला आणि शेहनाझ एकटी पडली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.