Shehnaaz Gill: स्वप्न पूर्ण करण्यासाठी धैर्य लागतं… आणि शहनाज गिलने ते धैर्य प्रत्यक्ष जगून दाखवलं. आज शहनाज गिलला ‘पंजाबची कॅटरीना’ म्हणून ओळखलं जातं, पण या यशामागे प्रचंड संघर्ष, कठीण निर्णय आणि एकटीने लढलेला प्रवास दडलेला आहे. शहनाज गिलचा जन्म पंजाबमधील जालंधर येथे झाला. शिक्षण घेत असतानाच तिला मॉडेलिंगची आवड निर्माण झाली. डलहौजी येथील हिलटॉप स्कूलमध्ये शिकत असताना तिने छोटे-मोठे मॉडेलिंग प्रोजेक्ट्स करायला सुरुवात केली. शाळा पूर्ण झाल्यानंतर तिने लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये बी.कॉमसाठी प्रवेश घेतला. मात्र मॉडेलिंगची ओढ इतकी वाढली की तिने शिक्षण अर्धवट सोडण्याचा कठीण निर्णय घेतला. Shehnaaz Gill हा निर्णय तिच्या कुटुंबाला, विशेषतः वडिलांना, मान्य नव्हता. त्यांना शहनाजने आधी शिक्षण पूर्ण करावं असं वाटत होतं. घरात वाढत्या मतभेदांमुळे आणि तणावामुळे अखेर शहनाजने घर सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि ती मुंबईत आली. घरापासून दूर, एकटीचा संघर्ष मुंबईत शहनाजकडे ना मोठा आधार होता, ना इंडस्ट्रीतील कुणी गॉडफादर. मात्र तिने स्वतःशी एकच निर्धार केला होता, “जोपर्यंत काहीतरी मोठं साध्य करत नाही, तोपर्यंत परत जाणार नाही.” या विश्वासावरच तिने आपल्या करिअरचा पाया घातला. पंजाबी इंडस्ट्रीतून मिळालं यश २०१५ मध्ये एका ब्यूटी कॉन्टेस्टमधून शहनाजला पहिला मोठा ब्रेक मिळाला. त्यानंतर तिने पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. ‘माझे दी जट्टी’, ‘पिंड दियां कुडियां’ आणि ‘ये बेबी रिमिक्स’ या गाण्यांमुळे ती प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली. पुढे पंजाबी चित्रपटांमध्येही तिला संधी मिळाली. ‘सत श्री अकाल’ आणि ‘काला शाह काला’ या चित्रपटांतील तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. Shehnaaz Gill ‘बिग बॉस 13’मुळे मिळाली राष्ट्रीय ओळख शहनाजच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला ‘बिग बॉस 13’. तिचा निरागस स्वभाव, बेधडक बोलणं आणि साधी शैली प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. शोमध्ये सिद्धार्थ शुक्लासोबतची तिची मैत्री आणि बॉन्डही चांगलाच चर्चेत राहिला. जरी ती शो जिंकू शकली नाही, तरी लोकप्रियतेच्या बाबतीत ती विजेत्याइतकीच ठरली. यानंतर शहनाजने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. अलीकडेच ती ‘थँक यू फॉर कमिंग’ आणि पंजाबी चित्रपट ‘इक कुडी’मुळे पुन्हा चर्चेत आहे. आज शहनाज गिलचा प्रवास हा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. स्वप्नांवर विश्वास ठेवल्यास आणि मेहनत करण्याची तयारी असल्यास, कोणतीही गोष्ट अशक्य नसते याचं जिवंत उदाहरण म्हणजे शहनाज गिल.