कॉंग्रेसचे राष्ट्रीय मीडिया समन्वयक रचित शेट यांचा राजीनामा

नवी दिल्ली – कॉंग्रेसचे राष्ट्रीय मीडिया समन्वयक रचित शेट यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पक्षात राजीनामासत्र सुरू झाले आहे.

राहुल गांधी यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी शेट यांनी आपला पदभार सोडला आहे. याबाबत त्यांनी रणदीप सुर्जेवाला यांना राजीनामा सादर केला आहे. रचित शेट यांनी पत्रात म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाला सोडचिठ्‌ठी दिल्यानंतर आता या पदावर कार्यरत राहण्यात स्वारस्थ राहत नाही. कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला होता. यानंतर रचित शेट यांनी पदभार सोडला.

Leave A Reply

Your email address will not be published.