मुंबई – देशभरात गाजलेल्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणाला पुन्हा एक खळबळजनक दावा करण्यात आल्याने नवीन वळण मिळाले आहे. शीना बोरा अजूनही जिवंत असल्याचा दावा इंद्राणी मुखर्जीचे वकील रणजित सांगळे यांनी मुंबई सत्र न्यायालयात केला आहे.
राहुल मुखर्जीच्या मोबाईलमधील संभाषण आणि मेसेज यावरून सिद्ध होते की शीना अजूनही जिवंत आहे, असे इंद्राणीचे वकील रणजित सांगळे यांनी म्हटले आहे. सष्टेंबर-ऑक्टोबर 2012 पर्यंत ते दोघे संपर्कात असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. शीना बोराला भेटणारा शेवटचा व्यक्ती हा राहुल मुखर्जी होता. त्यामुळे ती कुठं आहे, हे राहुल मुखर्जी सांगू शकतो.
या प्रकरणात महत्वाचा साक्षीदार राहुल मुखर्जीच्या उलटतपासणी दरम्यान अनेक प्रश्नांवर उत्तर देण्यास टाळाटाळ केली आहे. शीना बोरा जिवंत असल्याची पुन्हा चौकशी करण्यात यावी अशी मागणी इंद्राणी मुखर्जीचे वकील रणजित सांगळे यांनी केली आहे.
शीना बोरा प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात विशेष सीबीआय कोर्टात साक्षीदार राहुल मुखर्जीची उलटतपासणी सुरू आहे. यापूर्वी देखील इंद्राणी मुखर्जीतर्फे शीना बोरा जिवंत असल्याचा दावा करत चौकशी करण्याची मागणी करत सीबीआय कोर्टात अर्ज केला होता.