ती आधी मैत्रीच्या जाळ्यात अडकवायची अन मग करायची ‘तसलं काम’

औरंगाबाद: श्रीमंतांच्या मुलाला आपल्या जाळ्यात अडकवून नंतर त्याच्यासोबत लैंगिकसंबंध प्रस्थापित करायचे. आणि त्याचा चोरून व्हिडीओ बनवायचा. आणि त्या व्हिडिओचा धाक दाखवत ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात औरंगाबाद पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील दोघांना पुुंडलिक नगर पोलिसांनी अटक केली आहे. विश्वनाथ माळी (२२ रा. सिडको, एन-६), आणि कृष्णा नितीन क्षीरसागर (२१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुण हा गारखेडा परिसरातील रहिवासी आहे. दोन वर्षांपूर्वी त्याची एका मॉल मध्ये एका तरूणीसोबत ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. नंतर त्यांच्यात शारीरीक संबध झाले प्रस्थापित झाले हाते. त्यांच्यातील शारीरीक संबंधीाची आरोपी तरूणीने अन्य साथीदाराच्या मदतीने चोरून व्हिडिओ क्लीप तयार केली होती. ही क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत तिने आणि तिचा साथी दार राजू शिवशंकर सहाणी (२२, रा. गजानन कॉलनी) यांनी त्यास ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. दोन वर्षांपासून ही ब्लॅकमेलींग सुरू होती.

ही क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यास वैवाहिक जीवनावर परीणाम होईल आणि समाजात बदनामी होईल् या भितीपोटी पीडित तरुणाने या तरुणीला आणि राजू सहानी यांना पाचा लाख रूपये दिले होते. ही रक्क्म घेतल्यानंतर पुढे आपला तक्रारदाराशी कुठलाही संबंध राहणार नाही असे बॉण्ड पेपर वर त्यांनी लिहून दिले होते. परंतु, पैशाचा उल्लेख त्यात केला नव्हता.

दरम्यान तक्रारदार यंचे वडील एका राजकीपय पक्षाकडून पैठण विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवत असल्याचे समजताच तरूणी आणि तिच्या साधीदारांनी त्याना फोन करून तीन लाख रूपयांची मागणी केली. आरोपी तक्रारदार यांना पैसे घेऊन एक महाविद्यालयाच्या परीसरातील सुरक्षा रक्षकाच्या खेालीत पैसे ठेवण्याचे सांगितले होते. त्यानंतर तेथे ठेवलेली पैशाची बॅग घेण्यासाठी आलेल्या दोन जाणांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले आहे. या प्रकरणात दोघांना अटक केली असून तरुणांना जाळ्यात अडकवणारी तरुण फरार आहे. पोलिसांकडून तिचा शोध घेण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.