नवी दिल्ली – फसवणुकीच्या आरोपाखाली मंडोली कारागृहात बंद असलेले सुकेश चंद्रशेखर याने शनिवारी माध्यमांना आणखी एक पत्र लिहिले आहे. यावेळी त्याने नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यातील वादाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. सुकेशने पत्राद्वारे खुलासा केला आहे की सुकेशने जॅकलिनची साथ सोडावी असं नोरा फतेहीला वाटत होते. यासाठी नोरा त्याला दिवसातून दहा वेळा फोन करायची असं सुकेश म्हणतो.
वकिलामार्फत पाठवलेल्या पत्रात त्याने जॅकलिनसोबत चांगले संबंध असल्याचे म्हटले आहे. नोराला हे आवडले नाही. तिला जॅकलिनचा राग येत होता. ती मला जॅकलिनच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करत असे. नोराची इच्छा होती की त्याने जॅकलिनला सोडून तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहावे. सुकेशचे मॉडेल निक्की तांबोळी आणि चाहत खन्ना यांच्याशी व्यावसायिक संबंध होते. दोघेही त्याच्या प्रोडक्शनमध्ये काम करणार होते. सुकेशने नोरा फतेहीने जॅकलिनवर केलेले आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
नोरा जॅकलिनचा खूप द्वेष करायची,तसेच जॅकलिन विरोधात नोराने माझा ब्रेन वॉश केला असल्याचे देखील सुकेशने म्हंटले आहे.तसेच मी जॅकलिनसोबत रिलेशनमध्ये असल्याने नोराला टाळत होतो परंतु ती सतत कॉल करून त्रास देत असल्याचे देखील सुकेशने यावेळी म्हंटले आहे.
सुकेशने सांगितले की, नोराने ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेला वेग वेगळे जबाब दिले आहेत. यावरून ती एक कहाणी बनवत असल्याचे सिद्ध होते असं सुकेश म्हणतो. सुकेशने सांगितले की जेव्हा नोरा त्याला भेटली होती तेव्हा तिच्याकडे एकही महागडी कार नव्हती. सुकेशला तिला रेंज रोव्हर द्यायची होती, पण गाडी स्टॉकमध्ये नव्हती. म्हणून त्याने तिला एस सीरीजची बीएमडब्ल्यू कार भेट दिली. त्याने आरोप केला आहे की नोरा त्याला महागड्या बॅग आणि दागिन्यांची छायाचित्रे पाठवत असे. जो ते तिला गिफ्ट करायचा.