पिंपरी – संकेतस्थळावरून ओळख झालेल्या भावी जोडीदाराने पाठविलेली भेटवस्तू कस्टममधून सोडविण्याच्या नावाखाली दहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना बावधन येथे घडली.
याबाबत 41 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुकेश दास आणि इतर दोन खातेधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी महिला आणि आरोपी यांची एका विवाहविषयक संकेतस्थळावरून ओळख झाली. आरोपी मुकेश दास याने आपण नेदरलॅंड येथे असल्याचे सांगितले. त्यांनी फिर्यादी यांना मोबाईल, लॅपटॉप, अत्तर आणि अंगठी भेट म्हणून पाठविल्याचे सांगितले. त्यानंतर ते पार्सल दिल्ली येथे कस्टम अधिकाऱ्यांनी पकडल्याचे सांगितले.
ते पार्सल सोडविण्यासाठी कस्टम ड्युटी, जीएसटी, क्लिअरिंग आणि विमा अशी वेगवेगळी कारणे सांगून आरोपींच्या खात्यावर दहा लाख रुपये भरून घेत कोणतेही गिफ्ट न देता फसवणूक केली.