श्‍वानासाठी “तिने’ नाकारली पोटगी  

पुणे  – पाळीव प्राण्यावरील प्रेमापोटी माणूस काय करेल, हे सांगता येत नाही. असाच प्रकार येथील कौटुंबीक न्यायालयात घडला. विभक्त होत असलेल्या पत्नीने पोटगी नाकारली आणि पतीने नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी पाळलेल्या श्‍वानासाठी दरमहा दहा हजार रुपये देखभाल खर्च करण्याचे कबुल केले.

या पैशांतून पत्नीने श्‍वानाची योग्य ती देखभाल घ्यावी, पत्नी परदेशात गेल्यानंतर पतीने श्‍वानाला सांभाळायचे, तो आजारी पडल्यानंतर दोघांनी मिळून त्याची काळजी घ्यायची, तसेच महिन्याच्या 7 तारखेच्या आत माधवने माधवीच्या (नावे बदललेली) खात्यावर पैसे भरायचे, अशी तडजोड करून सामजस्यांने ते वेगळे झाले. विशेष म्हणजे, माधवीने पोटगीचा अधिकार सोडून देत केवळ श्‍वानासाठी देखभाल खर्च घेण्यास ती तयार झाली.

या दोघांचाही 2011 मध्ये प्रेमविवाह झाला होता. ते उच्च शिक्षित असून माधवचा व्यवसाय, तर माधवी गृहिणी होती. 2012पासून ते श्‍वानाचा सांभाळ करीत होते. त्यांच्यात मतभेद झाल्याने माधवीने घटस्फोटासाठी दावा केला होता. श्‍वानासाठी एकरकमी पाच लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, पतीने दरमहा रक्कम देण्याचे कबूल केले. हे सर्व प्रकरण समुपदेशानासाठी आल्यानंतर त्यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी त्यांना वाद न करता पुन्हा एकत्र येण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मात्र, दोघांनाही सोबत राहणे शक्‍य नसल्याने त्यांनी संमतीने घटस्फोटाचा निर्णय घेतला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)