सलाम त्या मातेला…! लेकीसाठी बिबट्याशी झुंजली

चंद्रपूर – बिबट्याने जबड्यात पकडलेल्या पाच वर्षांच्या मुलीसाठी आईने चक्क बिबट्यालाच अंगावर घेतले. आणि आपल्या पाच वर्षीय चिमुकली जीव वाचवला. चंद्रपूर शहराजवळ जुनोना गावाजवळ ही घटना घडली.

अर्चना मेश्राम आपल्या 5 वर्षीय मुलीसह गावाजवळील जंगलात भाजी तोडण्यासाठी गेल्या होत्या. आईपासून काही अंतरावर असणाऱ्या मुलगी प्राजक्तावर बिबट्याची नजर पडली. त्याने तिच्यावर हल्ला करताच आईने आरडाओरड सुरु केली.

बिबट्याने मुलीचं तोंड आपल्या जबड्यात धरून जंगलात नेण्यासाठी प्रयत्नात असताना तिने जवळच असलेला दांडक्‍याने बिबट्यावर प्रहार केले. अचानक झालेल्या या हल्ल्याने बावचळलेल्या बिबट्या मुलीला सोडून पसार झाला.

प्राजक्ताच्या चेहरा आणि डोक्‍यावर जखमा झाल्या. प्राथमिक उपचारानंतर जखमी मुलीला नागपूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे तिच्यावर उपचार सुरु आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.