…तिच्या खिशात होते अवघे शंभर रुपये आणि हातावर कॉरंटाईनचा शिक्का

पोलिसांनी असे काही केले की तुम्हीदेखील त्यांच्या कार्याला कराल सलाम

पुणे : बंगलोरमधून एक बेरोजगार तरुणी नोकरीसाठी पुण्यात दाखल झाली होती. मात्र तीच्या हातावर क्‍वॉरंटाईनचा शिक्का असल्याने तिला शहरात कोणीही रहाण्यासाठी भाड्याने जागा देत नव्हते. तसेच लॉकडाऊनमध्येच पहिली नोकरी गेल्याने तीची आर्थिक परिस्थितीही कमकुवत झाली होती. पुण्यात दाखल झाल्यावर तीच्या खिशात अवघे शंभर रुपये होते. मग करायचे काय , कुठे जायचे, कुठे रहायचे आणी काय खायचे असा प्रश्‍न गंभीर प्रश्‍न तीच्यासमोर होता. यानंतर अखेर तीने भटकट भटकत येरवडा पोलिस स्टेशन गाठले. यानंतर येरवडा पोलिसांनी तीला ज्याप्रकारे मदत केली ती बाब पोलिसांच्या कार्याला सलाम देणारी ठरली.

यासंदर्भात सविस्तर असे की,एक 24 वर्षाची तरुणी ( मुळ राहणार- लेकटाऊन, शिवभुमी कजे, कोलकता, पश्‍चिम बंगाल) हिचे शिक्षण बी.एस्सी.फिजीक्‍स पर्यंत झाले असून ती बेंगलोर येथील एका कंपनीत नोकरी करीत होती. लॉकडाऊनमुळे काही दिवसांपुर्वी तिची नोकरी गेल्याने ती बेरोजगार झाली. नोकरीचे शोधात असताना तिला पुण्यातील हिंजवडी येथील टेक महिंद्रा कंपनी येथे व्हॅकेन्सी असल्याचे समजले. तिने नोकरीसाठी अर्ज केला होता व तिचा 29 जूनला इंटरव्युव्ह आहे. त्यामुळे ती बेंगलोर येथून ट्रेनने दि.18 जूनला  पुणे स्टेशन येथे आली.

पुणे स्टेशन येथे आल्यावर तिचे हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला . तिचे पुणे येथे कोणीही नातेवाईक अथवा कोणीही मित्र मैत्रिण नसल्याने, तिने पेईंग गेस्ट म्हणून राहण्याचे उद्देशाने पुणे स्टेशन व कल्याणीनगर भागात रूम शोधण्याचा प्रयत्न केला. पण तिला कोणीच ठेऊन घेतले नाही. त्यामुळे ती रात्री दहाच्या सुमारास येरवडा पोलीस स्टेशन येथे आली. तिने तिच्याकडे फक्त 100 रू. असून तिला रूमसाठी मदत करण्याची विनंती केली. तेव्हा लागलीच वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख यांनी महिला पोलिस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम व महिला स्टाफला बोलावून घेतले.

संबंधीत तरुणीला मास्क, सॅनिटायझर देऊन येरवडा पोलीस स्टेशन येथील महिला अधिकारी व कर्मचारी यांचे विश्रांतीकक्षात राहण्याची व्यवस्था केली. सोबत महिला पोलिस नाईक राजे व महिला पोलिस शिपाई रासकर असा महिला स्टाफ ठेवला. शुक्रवारी सकाळी तिच्या चहा नाष्टा, जेवणाची व्यवस्था करून महिला पोलीस स्टाफसह पाठवून तिची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली. तीच्याकडे पैसे नसल्याने येरवडा पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी राहणेसाठी व स्वखर्चासाठी पुरेशी रक्कम गोळा करून दिली.

यानंतर कोथरुड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी, कोथरूड यांचेशी संपर्क साधून मुलीचे राहण्याची व्यवस्था कोथरूड पोलिस स्टेशनच्या हद्दीत दशभुजा गणपती मंदिराजवळ भाडेतत्वावर मिळणाऱ्या रूम मध्ये करण्यात आली. तिला महिला पोलीस स्टाफसह त्या ठिकाणी सुरक्षितरित्या पोहोचविण्यात आले आहे. पोलीसांनी केलेल्या मदतीबद्दल सदर मुलीने पुणे पोलीसांचे आभार व्यक्त केले आहेत. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.