हैदराबाद : करोना काळात अनेक ठिकाणी माणुसकी संपल्याचे अनुभव अनेकांना आले. आता मात्र स्थिती सामान्य झाली असून लोकांच्या मनातील करोनाविषयीची भीती कमी झाली आहे. मात्र हैदराबाद येथे करोनाची भीती कायम असल्याचे दिसून आले. मात्र मात्र महिला पोलीस उपनिरीक्षकाने जे केलं त्याने करोना काळात पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडले.
येथील एका गावात बेवारस मृतदेह आढळून आला होता. मृतदेहावर गावातील कोणीही हक्क सांगितला नाही. तसेच करोनाच्या भीतीमुळे कोणी मृतदेहाला स्पर्श करण्यासही तयार नव्हते. अखेर पोलीस निरीक्षकांनी एकत्र येत मृतदेह खांद्यावर घेऊन दोन किलोमीटर प्रवास केला. एवढच नाही तर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
श्रीकाकुलम जिल्ह्यातील कासीबुग्गा येथे तैनात उपनिरीक्षक के. श्रीशा यांनी केलेल्या कामामुळे सर्वच स्तरावर त्यांचं कौतुक होत आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. कृष्णा रेड्डी यांनीही तरुण पोलीस अधिकाऱ्यांच्या या अनोख्या कामाचं कौतूक केलं आहे.
Andhra woman officer carries corpse after villagers refusehttps://t.co/dFNdWtjCKN#AndhraPradesh @APPOLICE100 @dgpapofficial @lawscomm #Humanity #Funeral pic.twitter.com/uRmlGxtAUu
— Sharon Thambala (@SharonThambala) February 2, 2021
यावेळी ते म्हणाले की, आपल्या कर्तव्याची जाण ठेवत अज्ञात मृतदेहावर अंत्यसंस्कार करून मदत केल्याने या टीमने देशातील प्रत्येक पोलिसांची मानवी मुल्य आपल्या मनात पुन्हा जागवली आहेत.
या घटनेचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. आंध्र प्रदेशचे पोलीस प्रमुख डी. गौतम सावंग यांनीसुद्धा या तरुण पोलीस अधिकाऱ्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. श्रीकाकुलम जिल्ह्यातील पलासा कासीबुग्गा नगरपालिकेच्या आदिविकोट्टुरू गावात शेतातील लोकांनी एक अज्ञात मृतदेह पाहिला. पण कोणीही त्यावर अंत्यसंस्कार करण्यास तयार नव्हतं. मात्र श्रीशाने ललिता यांनी चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीने मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.