पेईंग गेस्ट म्हणून आली अन्‌ डल्ला मारून गेली

कोल्हापूर (प्रतिनिधी): पेईंग गेस्ट म्हणून घरी राहण्यास आलेल्या तरुणीने सोन्याच्या दागिने व विविध बॅंक खात्यांतील रकमेसह 94 हजारांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी रोहिणी होनमोरे (वय 31, रा. विशालतीर्थ पार्क, ता. करवीर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून स्नेहा दिलीप सातपुते (रा. सुभाषनगर) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर तरुणी 13 मे ते 19 जून 2020 पर्यंत फिर्यादीच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहात होती.

या दरम्यान तिने मोबाइलद्वारे विविध बॅंक खात्यांतून वेळोवेळी 15 हजार रुपये काढून घेतले. तर कपाटात ठेवलेल्या 22 ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या अंदाजे किंमत 66 हजार असा 94 हजारांचा मुद्देमाल चोरून लंपास केला आहे.

यासोबत तिने फिर्यादीचे आधार कार्ड, पॅन कार्ड, घराची कागदपत्रे, शैक्षणिक कागदपत्रे, जातीचा दाखला, सहीची सॉफ्ट कॉपी असे गुगल ऍपद्वारे चोरून नेल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी करवीर पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली असून
सहाय्यक फौजदार भगवान गिरीगोसावी तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.