भारतविरोधी घोषणा देणाऱ्या पाक समर्थकांना शाझिया इल्मींचे सडेतोड उत्तर

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरमधील कलम 370 हटवल्याने पाकिस्तानचा सर्वच स्तरावर तांडव सुरू आहे. दरम्यान, भारताच्या या निर्णयाचा जगभरात राहणाऱ्या पाकच्या नागरिकांनीदेखील विरोध दर्शवला आहे. याचा प्रत्यय वेळोवेळी येत आहे. अशीच घटना दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये समोर आली. सेऊलच्या रस्त्यावर शेकडो पाकिस्तानी समर्थकांकडून, मोदी, दहशतवादी, भारत दहशतवादी, अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात होत्या. घोषणाबाजी करणाऱ्या या शेकडोंच्या जमावाला भाजपाच्या शाझिया इल्मी यांनी सडेतोड उत्तर दिले.

शाझिया इल्मी यांच्यासोबत दोन अन्य भाजपा आणि आरएसएसचे नेते सेऊलमध्ये उपस्थित होते. केवळ तीन भारतीयांनी

घोषणाबाजी करणाऱ्या तीनशे पाकिस्तानी समर्थकांना सडेतोड उत्तर दिलं अशा आशयाचे ट्‌विट करत शाझिया इल्मी यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. भाजपा नेत्या शाझिया इल्मी या काही आरएसएस नेत्यांसह सेऊलमध्ये भारतीय दुतावासात गेल्या होत्या आहेत. त्यावेळी थोड्या अंतरावर शेकडो पाकिस्तानी समर्थकांचा जमाव भारतविरोधी घोषणाबाजी करत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यावर शाझिया इल्मी आणि नेत्यांनी आम्ही भारतातून आल्याचे सांगत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण शाझिया इल्मी यांचे पूर्ण बोलणे न ऐकून घेता त्या जमावाने पुन्हा एकदा घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर देशविरोधी आणि मोदींविरोधी नाऱ्यांमुळे चिडलेल्या शाझिया इल्मी यांनी त्या जमावासमोर भारत जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत सडेतोड प्रत्युत्तर दिले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×