Shayna NC on Arvind Sawant । राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना चांगलाच जोर आला आहे. सर्वच पक्षांचे उमेदवारजोरात आपापल्या मतदारसंघात प्रचार करण्यात मग्न झाले आहेत. शिवसेनेच्या दोन्ही गटांनी मुंबई आणि मुंबईतील मतदारसंघ चर्चेतील चेहरे दिले आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मुंबादेवी येथून शायना एन सी यांना तिकीट दिले आहे. दरम्यान, एकीकडे प्रचाराला वेग आलेला असताना त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे या भेटीनंतर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांचाही चांगलाच समाचार घेतला.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते तथा खासदार अरविंद सावंत यांनी शायना एन सी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या याच विधानाचा आता शायना एन सी यांनी समाचार घेतला आहे. याविषयी बोलताना “एका महिलेला ते ‘माल’ म्हणून संबोधत आहेत.जो महिलांचा आदर करेल त्यालाच लोक निवडून देतील. आम्हीही अरविंद सावंत यांचा प्रचार केला होता,” असे त्यांनी यावेळी म्हटले.
23 तारखेला जनता तुमचे हाल करेल Shayna NC on Arvind Sawant ।
पुढे बॉट्लना त्यांनी, “माझा माल असा उल्लेख केला तर जनता तुमचे 23 तारखेला हाल करेल. महिलांबाबत असं बोलणाऱ्या पक्षांची मानसिकता दिसून येतेय, असेही म्हटले. यावेळी त्यांनी अरविंद सावंतांची ऑडिओ क्लिप ऐकवली. तसेच 2014, 2019 सालच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने त्यांनी मतं मागितली होती, अशी टीका शायना एन सी यांनी केली.
पहाटे राज ठाकरेंची भेट Shayna NC on Arvind Sawant ।
दरम्यान, आज दिवाळीच्या दिवशी पहाटे शायना एन सी यांनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. याठिकाणी त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. शायना एन सी या शिंदेंच्या शिवसेनेच्या मुंबादेवीच्या उमेदवार आहेत. मनेसेने येथून ताकद पुरवल्यास शायना यांचा विजय सोपा हाऊ शकतो. त्याचीच चाचपणी करण्यासाठी शायना एन सी या राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याचे म्हटले जात आहे. मनसेकडून पाठिंबा मिळाल्यास शायना एन सी यांना बळ मिळू शकते.
राज ठाकरेंच्या भेटीवर शायना एन सी म्हणाल्या
या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बातचित केली. मी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांना मी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कुटुंबाचे आणि आमचे जुने पारंपरिक संबध आहेत. आमच्या या भेटीत राजकीय चर्चा झालेली नाही, असे शायना एन सी यांनी सांगितले.