बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेता शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा हे “जरुरत’ या गाण्यात एकत्रित दिसणार आहेत. या गाण्याचे दिग्दर्शन वरुण प्रभुदयाल गुप्ता यांनी केले आहे. हे गाणे नुकतेच रिलीज झाले असून चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गाणे रिलीज झाल्यानिमित्त शत्रुघ्न सिन्हा आणि सोनाक्षी सिन्हा म्हणाले, “जरुरत’ या गाण्याबाबत श्रोत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही खूपच उत्सुक आहे. यात गाणे, कथा आणि रॅप याचा सुरेख मिलाप करण्यात आला आहे. आम्हाला आशा आहे की, “जरुरत’ हे गाणे आजची आवश्यकता असून या गाण्यातून लोकांना एकमेकांच्या प्रति सहानुभूती निर्माण करण्यास मदत मिळेल. “जरुरत’ हे गाणे सर्व स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
दरम्यान, सोनाक्षी सिन्हाने एक व्हिडिओ क्लि देखील शेअर केली होती. यात तिने हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या 10 वर्षांच्या कारकिर्दीची झलक दाखविली आहे.