शत्रुघ्न सिन्हा करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्याने लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढू लागला असताना राजकीय उलथापालथ देखील सुरू झाली आहे.

यातच सूत्रांच्या माहितीनुसार भाजप पक्षावर नाराज शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. ते पटना साहिबमधून लोकसभा निवडणूक लढतील. सूत्रांच्या माहितीनुसार बिहारमध्ये महागठबंधन करण्यासाठी शत्रुघ्न सिन्हा यांची मुख्य भूमिका होती. बिहारमध्ये महागठबंधनमध्ये कॉंग्रेस पक्ष नऊ जागांवर निवडणूक लढण्यासाठी तयार झाला आहे. या नऊ जागांमध्ये पटना साहिब येथून ‘बिहारी बाबु’ शत्रुघ्न सिन्हा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.