चेन्नई : तामिळानाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची खास मैत्रिण असणाऱ्या व्ही. के. शशीकला यांची तब्बल एक हजार 600 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता प्राप्तीकर विभागाने मंगळवारी गोठवली.
यात चेन्नई, पुदुचेरी आणि कोइमतूरमधील नऊ मालमत्तांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चलनीकरणाचा निर्णय जाहीर केल्यानंतर या मालमत्तांची खरेदी करण्यात आली होती.
शशीकला यांनी या कथित बेनामी मालमत्ता नोटाबंदी असणाऱ्या 500 आणि हजार रुपयांच्या नोटा देऊन या दीड हजार कोटी रुपयांना बनावट नावाने घेण्यात आल्या.
बेकायदा मालमत्ता जमवल्याच्या प्रकरणात बंगळुरू कारागृहात शिक्षा भोगत असणाऱ्या शशीकला यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ही मालमत्ता गोठीत करण्यात आली. या मालमत्ता रोखीच्या स्वरूपात घेऊन त्याबाबत साठेखत करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.