Shashi Tharoor: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ वर घेतलेल्या आपल्या भूमिकेवरून माघार घेण्यास किंवा माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला आहे. “मी काही चुकीचे केले नसेल, तर झुकण्याचा प्रश्नच येत नाही,” अशा कडक शब्दांत थरूर यांनी आपले स्पष्टीकरण दिल्याने राहुल गांधी आणि त्यांच्यातील वादाला नवीन तोंड फुटले आहे. राहुल गांधींसोबतची ओढाताण कायम – Rahul Gandhi गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकींमध्ये शशी थरूर यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. राहुल गांधी यांच्यासोबत सुरू असलेले हे शीतयुद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यातच आता राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर, विशेषतः पाकिस्तानविरोधी कारवाईत केंद्र सरकारच्या पाठीशी उभे राहण्याच्या भूमिकेवर थरूर ठाम राहिल्याने काँग्रेस नेतृत्वाची अडचण झाली आहे. काय आहे वादाचे मुख्य कारण? शशी थरूर यांनी स्पष्ट केले की, त्यांनी संसदेत कधीही पक्षाच्या अधिकृत भूमिकेचे उल्लंघन केलेले नाही. मात्र, ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवण्याच्या पद्धतीवरून त्यांचे पक्षाशी सार्वजनिक मतभेद आहेत. यासंदर्भात माहिती देताना त्यांनी खालील मुद्दे मांडले. राष्ट्र प्रथम: थरूर यांच्या मते, जेव्हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो, तेव्हा राजकीय मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत. “भारत सर्वोपरि आहे,” असे त्यांनी सांगितले. अपमानाची भावना: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोची येथे झालेल्या एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी थरूर यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने ते दुखावले गेले आहेत. दिल्लीत पार पडलेल्या केरळ निवडणूक रणनीती बैठकीला त्यांनी दांडी मारल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. हायकमांडची सारवासारव- दरम्यान, काँग्रेस नेतृत्वाने थरूर यांच्या अनुपस्थितीवर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. “केरळ साहित्य महोत्सवातील पूर्व नियोजित कार्यक्रमांमुळे थरूर बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत,” असे पक्षाकडून सांगण्यात आले. मात्र, पक्षांतर्गत गोटात या विधानावर कोणाचाही विश्वास बसताना दिसत नाही. हेही वाचा – Today TOP 10 News: अजित पवार उपमुख्यमंत्री पद सोडणार?, 400 कोटींची चोरी ते तिसऱ्या महायुद्धाची भीती… वाचा आजच्या टाॅप बातम्या