नवी मुंबई – देशात मागील काही दिवसांपासून तुकडे-तुकडे गॅंग नावाचा उल्लेख फार मोठ्या प्रमाणात होताना पहायला मिळाला आहे. परंतू, याच तुकडे-तुकडे गॅंगमुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची चांगलीच गोची झाली असल्याचे दिसत आले. कारण केंद्रीय गृहमंत्रालयाकडे देशातील तुकडे तुकडे गॅंगबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही, असे स्पष्टीकरण माहिती अधिकार अर्जाला उत्तर देताना सरकारने दिले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर ट्विट करत निशाणा साधला आहे.
The tukde-tukde gang does exist. They are running the Government and dividing the nation. pic.twitter.com/s4AaZKJLzH
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) January 21, 2020
शशी थरूर यांनी ट्विट केले आहे की,’ देशात तुकडे तुकडे गॅंग अस्तित्वात ती गॅंग सरकार चालवत आहे, तसेच देशाचे विभाजन करत आहे.’ असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
तत्पूर्वी, भाजपाच्या नेत्यांकडून तुकडे तुकडे गॅंग हा उल्लेख वरचे वर होऊ लागला. याचसंदर्भात गोखले यांनी महिती अधिकार हक्काअंतर्गत अर्ज करुन तुकडे तुकडे गॅंगबद्दल सरकारकडे असणारी माहिती उघड करावी अशी मागणी केली होती. याच अर्जाला आलेल्या उत्तराचे स्क्रीनशॉर्ट शेअर करत संकेत गोखले यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला होता.