दिल्ली : लेखक आणि कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांना त्यांच्या ‘अॅन एरा ऑफ डार्कनेस’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांना इंग्रजी भाषेसाठी मिळाला आहे. थरूर हे तिरुअनंतपुरमचे खासदार आहे. २०१६मध्ये या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते.
थरूर यांचे पुस्तक ‘अॅन एरा ऑफ डार्कनेस: ब्रिटीश एम्पायर इन इंडिया’ हे भारतातील ब्रिटीश राजवटीवर आहे. शशी थरूर यांनी ‘पॅराडॉक्सिकल प्राइम मिनिस्टर’, ‘वायआयएमए हिंदू’ आणि ‘इंग्रज साम्राज्य’ आदी पुस्तके लिहली आहे.
आज 18 डिसेंबर रोजी साहित्य अकादमीने एक प्रसिद्धीपत्रक प्रशिध्द करून 23 भाषांमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली आहे. हिंदीतील साहित्यातील कवितेसाठी नंदकिशोर आचार्य यांच्या छिलते हुए अपनो को’, उर्दूमध्ये ‘जीवनी ‘सवनेह-ए-सर सैयद: एक बाज़दीद’ साठी शाफे किदवई यांना तर, मराठीत अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजूनही’ या कावयसंग्रहाला हा सन्मान मिळाला.