शशांक केतकरचे पुण्यातील ‘आईच्या गावात’ हॉटेल होणार बंद

मुंबई – मराठीतील प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकरचे पुण्यात ‘आईच्या गावात’ हे रेस्टॉरंट आहे. नव्या पेठेतील हे छोटेखानी हॉटेल कोथरुडकरांसाठी जिव्हाळ्याचा विषय होता. मात्र आता हे हॉटेल बंद होणार आहे. शशांक केतकरनेची ही माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे.

त्यामध्ये तो लिहितो, “शाळा-कॉलेजमध्ये असताना एक स्वप्न पाहिल होत की आपल स्वतःच हॉटेल असल पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण ही झाल! पुण्यात ‘आईच्या गावात’ या नावाने हॉटेल सुरूही केल आणि गेली तीन साडेतीन वर्ष आई-बाबा, दीक्षा, प्रियांका आणि हॉटेलचा सगळा स्टाफ यांच्या सपोर्ट ने ते उत्तम चालू ही ठेवलं. मात्र, काही वैयक्तिक कारणांमुळे आता आम्हाला हा व्यवसाय बंद करावा लागतोय. आत्ताच्या जागेवर संपूर्ण सेटपसहित जर कोणाला हॉटेल चालवायचे असल्यास मला संपर्क साधावा किंवा हॉटेलचे सामान विकत घ्यायचे असल्यासही मला संपर्क साधावा.”

दरम्यान, शशांकने असे जरी लिहिले असले तरी हे हॉटेल बंद होऊ नये असे त्याच्या चाहकत्यांना वाटते. त्यानी यासाठी कॉमेंट्स करायला सुरूवात केली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.