मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या कारला अपघात झाला आहे. या अपघातात शर्मिला ठाकरे यांना मुका मार लागला असून, चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. संपूर्ण ठाकरे कुटुंब एकवीरा देवीचं दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात झाला.
नवी मुंबईतील सानपाड्याच्या सिग्नलजवळ एक ऑटो रिक्षा अचानक शर्मिला यांच्या कारच्या समोर आली. तिला धडक बसू नये म्हणून चालकाने कारचा ब्रेक लावला. त्याचवेळी मागून आलेल्या गाडीनं शर्मिला यांच्या कारला धडक दिली. मात्र त्यावेळी राज ठाकरे यांची कार पुढे निघून गेली होती. दरम्यान, अपघातग्रस्त कार मध्ये शर्मिला ठाकरे यांच्याबरोबरच राज यांची बहीण देखील होती.