मुंबई – बॉलीवुड एक्ट्रेस करीना कपूर आपल्या हटके अंदाजाने नेहमीच सिनेप्रेक्षकांचे मने जिंकत असते. बेबोचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर नेहमीच ट्रेण्डिंग असतात. यातच सध्या तिच्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर सर्वांना आश्चर्यात टाकेल आहे. बेबोचा हा व्हिडिओ चांगलाच वायरल होत आहे.
View this post on Instagram
#chandigarhmein ❤️❤️❤️❤️ @dharmamovies @rujuta.diwekar @poonamdamania @nainas89 ?
दरम्यान, या व्हिडिओमध्ये तिने थेट जेष्ठ अभिनेत्री आणि तिची सासू शर्मिला टैगोर यांना मुलगी आणि सून यामध्ये काय फरक असतो ? असा प्रश्न विचारला होता यावर शर्मिला टैगोर यांनी जे उत्तर दिले त्यामुळे सद्या नवाब फॅमिलीची सोशल मीडियावर फॅन्सने चांगलीच स्तुती केली आहे.
करीना कपूरने तिच्या रेडियो शो ‘वॉट वुमेन वॉन्ट’दरम्यान, शर्मिला टैगोर यांना मुलगी आणि सून यामध्ये काय फरक असतो ? असा प्रश्न विचारला असता याचं उत्तर देताना शर्मिला म्हणाल्या की, ‘मुलीचा स्वभाव तुम्हाला माहीत असतो. तिला काय आवडतं काय नाही याबद्दल तुम्हाला पूर्ण जाणीव असते. सूना या आधीपासूनच समजूतदार असतात. तुम्हाला त्यांची आवड- निवड माहीत नसते. त्यामुळे त्यांच्यासोबत जुळवून घेण्यात थोडा वेळ लागतो. तसेच सून जेव्हा तिच्या घरातून तुमच्या घरात येते तेव्हा तिचं खुल्या मनानं स्वागत करणं आपली जबाबदारी असते.’