व्हिडिओ शेअर करत ‘पूजा हेगडेने’ घातला सोशलवर धुमाकूळ!

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री पूजा हेगडेने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने आपला लूक तीन वेळा बदलला आहे. तिच्या मेसी लूकपासून ते स्टायलिश लूकपर्यंत सगळ्यातच ती खूप सुंदर दिसत आहे. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

त्यानंतर, या व्हिडिओमध्ये तिने प्रियासारखा डोळा मारला आहे. पूजा हेगडेचा हा व्हिडिओ पाहून चाहते घायाळ झाले आहे. इतकेच नव्हेतर काही तासांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

पूजाची ही अदा पाहून अनेकांना ‘Wink Sensation’ ठरलेल्या प्रिया प्रकाश वॉरियरची आठवण आली आहे. पूजाने हा व्हिडिओ केवळ 48 तासांपूर्वी अपलोड केला आहे. त्याला आतापर्यंत दहा लाखांहून अधिक लाईक्‍स मिळाले आहेत आणि दर तासाला हे लाईक्‍स खूप वेगाने वाढत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

ड्रेसिंग टेबलच्यासमोर बसून पूजाने हा व्हिडिओ बनवला आहे. ज्यामध्ये त्याचा पहिला लूक असा आहे की, तो अगदी झोपेतून उठल्यासारखा वाटत आहे. मग पूजाने एक टर्न घेतला आणि तिचा लूक बदलला आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास दक्षिणात्य चित्रपटांसोबतच ती रणवीर सिंगच्या “सर्कस’ आणि सलमानसोबत “कभी ईद कभी दिवाली’मध्ये दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

चाहते तिच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहात आहेत. अभिनेता विजयसोबत “थलापती 65′ या चित्रपटासाठी तिने 3 कोटी इतकी फी आकारली आहे. प्रभास सोबतच्या ‘राधे श्‍याम’ या चित्रपटातही पूजा हेगडे झळकणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.