इन्फोसिस, विप्रो, माईंडट्री कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ

मुंबई – इन्फोसिस, विप्रो, माइँडट्री या कंपन्यांनी काल चमकदार ताळेबंद जाहीर केल्यामुळे आज या कंपन्यांच्या शेअरच्या भावात बरीच वाढ नोंदली गेली असल्याचे दिसून आले.
दुसऱ्या तिमाहीत नफा वाढल्यामुळे इन्फोसीस कंपनीच्या शेअरचा भाव आज चार टक्‍क्‍यांपर्यंत वाढला होता. नंतर तो कालच्या पातळीवर स्थिर राहीला.

याच कारणामुळे विप्रो कंपनीच्या शेअरचा भाव पाच टक्‍क्‍यांपर्यंत वाढला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नव्याने उतरलेल्या माईंडट्री कंपनीच्या शेअरच्या भावातही आज 8 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आणि या कंपनीच्या शेअरचा भाव 52 आठवड्याच्या उच्चांकी पातळीवर गेला.

या आठवड्यामध्ये टीसीएस कंपनीने अपेक्षाभंग करणारा ताळेबंद जाहीर केल्यामुळे गेल्या आठवड्यात माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांचे शेअर पिछाडीवर होते. मात्र आता या तीन कंपन्यांनी चांगले ताळेबंद जाहीर केल्यामुळे इतर माहिती तंत्रज्ञान कंपन्या चांगले ताळेबंद जाहीर करतील अशी आशा निर्माण झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.