Shares of Gautam Adani। अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये आज उत्सवाचे वातावरण आहे. अदानी समूहाच्या बाजूने काटा बनलेल्या अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्च कंपनी बंद झाली आहे. शॉर्ट सेलर नेट अँडरसन यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये हिंडेनबर्ग रिसर्च बंद होण्याची माहिती शेअर केली. त्यानंतर आजच्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजार उघडताच, अदानी ग्रुपच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून येत आहे. अदानी पॉवरपासून अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी एंटरप्रायझेसपर्यंत, शेअर्स ८ टक्क्यांपर्यंत वाढीसह व्यवहार करत आहेत.
गौतम अदानींच्या शेअर्समध्ये आज आनंदोत्सव Shares of Gautam Adani।
अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये, अदानी पॉवरचा शेअर ७.८ टक्के, अदानी ग्रीन एनर्जीचा ७.८ टक्के, अदानी ग्रीन एनर्जी सोल्युशन्सचा ५.१८ टक्के, एसीसीचा ३.४७ टक्के, अदानी एंटरप्रायझेसचा ५.७८ टक्के, अदानी पोर्ट्स अँड सेझचा ४.२९ टक्के, अदानी टोटल गॅसचा शेअर ७.८ टक्के, अदानी ग्रीन एनर्जी सोल्युशन्सचा शेअर ५.१८ टक्के, अदानी पोर्ट्स अँड सेझचा शेअर ४.२९ टक्के, अदानी टोटल गॅसचा शेअर २.५ टक्के, अदानी ग्रीन एनर्जी ग्रीन एनर्जीचा शेअर २. ५.२१ टक्के, अंबुजा सिमेंट ४.०१ सांघी इंडस्ट्रीज २.९२ टक्क्यांनी वाढीसह व्यवहार करत आहेत. फक्त अदानी विल्मरच्या शेअर्समध्ये थोडीशी घसरण दिसून येत आहे.
नॅट अँडरसनने हिंडेनबर्ग रिसर्च कंपनी बंद Shares of Gautam Adani।
हिंडेनबर्ग रिसर्चने त्यांच्या सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये संस्थापक नेट अँडरसन यांची कंपनी बंद करत असल्याची माहिती शेअर केली. या पोस्टमध्ये नॅट अँडरसन यांनी, “मी गेल्या वर्षाच्या अखेरीस कुटुंब, मित्र आणि आमच्या टीमसोबत शेअर केले आहे की मी हिंडेनबर्ग रिसर्च विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या तपासात्मक कल्पनांची पाइपलाइन पूर्ण केल्यानंतर ती बंद करण्याचा विचार होता, असे अँडरसन म्हणाले. हिंडेनबर्ग रिसर्चने अलीकडेच पॉन्झी योजनांशी संबंधित त्यांचे शेवटचे प्रकल्प पूर्ण केले, ज्यामुळे त्यांचे उपक्रम संपले.” असे त्यांनी म्हटले आहे.
अदानी ग्रुपवर गंभीर आरोप
हिंडेनबर्ग रिसर्चने जानेवारी २०२३ मध्ये अदानी समूहाविरुद्ध एक अहवाल जारी केला होता, ज्यामध्ये बाजारातील फेरफार आणि अकाउंटिंग फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता. हिंडेनबर्गने अदानी स्टॉकमध्येही घट केली होती. यानंतर, समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आणि बाजार भांडवल सुमारे २० लाख कोटी रुपयांवरून सुमारे ७.५० लाख कोटी रुपयांवर आले.