नवी दिल्ली – भारत पेट्रोलियम कार्पोरेशन आसाम मधील नुमालिगड तेल शुद्धीकरण कारखान्यातील आपला हिस्सा विकणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या कंपनीच्या शेअरच्या भावात तीन टक्क्यांची वाढ झाली.
या व्यवहारातून कंपनीला 9,876 कोटी रुपये मिळणार असून त्यातील काही भाग गुंतवणूकदारांना विशेष लाभांश म्हणून देण्यासाठी वापरला जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
शिपिंग कार्पोरेशन
शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीच्या शेअरचा भाव 20 टक्क्यांनी वाढून 52 आठवड्याच्या उच्चांकी पातळीवर गेला. कंपनीचे भागभांडवल खरेदी करण्याची इच्छा बऱ्याच कंपन्यांनी व्यक्त केली असल्याची माहिती समोर आल्यानंतर कंपनीच्या शेअरची मागणी वाढली.
वाहन क्षेत्रातील कंपन्या
फेब्रुवारी महिन्यात वाहन विक्री वाढल्याची आकडेवारी काल जाहीर झाल्यानंतर वाहन क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात पाच टक्क्यांपर्यंत वाढ झाली. त्यामध्ये महिंद्रा, हिरो मोटो मारुती सुझुकी, टीव्हीएस मोटार कंपनी, टाटा मोटर्स, इशर मोटर्स या कंपन्यांचा समावेश होता. त्याचबरोबर एक्साइड इंडस्ट्रीज, एम आर एफ टायर या कंपन्यांच्या शेअरच्या भावातही वाढ झाली.