रिअल इस्टेट सेक्‍टरशी निगडित शेअरचा नफा वाढणार

देशभरात रिअल इस्टेट क्षेत्रात सध्या मंदीचे वातावरण आहे. त्याचा परिणाम रिअल इस्टेटशी निगडित कंपन्यांच्या शेअरवरही दिसत आहे. निफ्टी रिअल्टी इंडेक्‍सची कामगिरी गेल्या दोन-पाच वर्षांत जेमतेम राहिली आहे. या सेक्‍टरमधील शेअरनी अनुक्रमे उणे 11.9, उणे 20.9 आणि उणे 48.8 टक्के परतावा दिला आहे. मात्र, आता या सेक्‍टरच्या काही शेअरमध्ये चांगला परतावा मिळण्याचे वातावरण तयार झाले आहे. न विकल्या गेलेल्या घरांची संख्या कमी होत आहे. प्री-सेल्स वाढत असून गृहकर्जाच्या व्याजदरात झालेली घट यासह अन्य कारणामुळे रिअल इस्टेट सेक्‍टरमध्ये तेजी येण्याची शक्‍यता आहे.

जेपी मॉर्गनच्या एका संशोधन अहवालानुसार निवासी बाजारात 2011 पासून मंदी सुरू झाली असून ती सात वर्षांनंतर जवळपास संपुष्टात आली आहे. मोठ्या विकासकांच्या प्रकल्पांना वाढती मागणी आणि कर्जाच्या व्याजदरातील घट हे त्याचेच द्योतक मानले जात आहे. लिस्टेड कंपन्यांच्या कर्जात घट झाली आहे आणि वाढत्या कॅश फ्लोमुळे नवीन योजना सुरू करण्याची शक्‍यता वाढत चालली आहे. कमर्शियल रिअल इस्टेट सेक्‍टरपासूनही या सेक्‍टरच्या विकासासाठी मदत मिळत आहे. आगामी काळात बडे विकासक हे मोठ्या योजनेची घोषणा करू शकतात. त्यामुळे रिअल इस्टेटमध्ये भांडवल वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. अन्य एका अहवालात बॅंकांची व्याजदर हे रिअल इस्टेट सेक्‍टरच्या अनुसरून होत आहेत. त्यामुळे विकासकांच्या फायद्यात चांगली वाढ होऊ शकते. भविष्यात व्याजदर आणखी कमी होऊ शकतात.

त्यामुळे रिअल इस्टेटला आणखी बुस्ट मिळू शकते. आगामी काळात परवडणाऱ्या घरांच्या योजनांमुळे हौसिंग सेगमेंटला फायदा होणार आहे. देशभरात मार्च 2018 ते मार्च 2019 या काळात घराच्या किमती वाढल्याचे अहवालात म्हटले आहे. अशा स्थितीत शेअर बाजारच्या तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूक ही चांगल्या लिस्टेट कंपनीत करता येऊ शकते. ज्या कंपनीची प्री-सेल्स वाढली आहे, अशांचे शेअर खरेदी करावेत, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. भांडवलवाढ आणि खरेदी-विक्रीचे प्रमाणही अपेक्षेप्रमाणे होण्याच्या शक्‍यतेने पुढील वर्षात या सेक्‍टरमध्ये स्थिरता येईल, असा अंदाज आहे. बहुतांश तज्ज्ञ हे निफ्टी रिअल्टी इंडेक्‍सचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत.

– जगदीश काळे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)