बीड – सोशल मीडियावर अनेकजण आपले मत व्यक्त करत असतात. राजकीय नेत्यांविरुद्ध अनेक टीका फेसबुकच्या माध्यमातून करण्यात येतात. मात्र अशीच टीका गुजरातच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध बीड येथील एका तरुणाने केली होती. फेसबुकवर केलीली ही पोस्ट बीडच्या तरुणाला चांगलीच महागात पडली आहे.
आरोपी तरुणाला गुजरातच्या सायबर पोलिसांनी नोटीस बजावून अटक केली आहे. फैसल खान युसूफझाई असं त्या तरुणाचं नाव आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्याबद्दल सोशल मीडियावर अपमानास्पद टिप्पणीची पोस्ट फैसल याने 15 महिन्यांपूर्वी केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत अहमदाबाद शहरातील सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक के.के मोदी यांनी सिरसाळा येथील मोबाईल शॉपचा मालक फैसल खान युसूफझाई या तरुणाविरोधात तक्रार दाखल केली होती. 18 एप्रिल 2020 रोजी फैसलवर कलम 505 (1) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
दरम्यान गुन्हा दाखल केल्यानंतर आता याप्रकरणी 15 महिन्यानंतर अहमदाबाद सायबर पोलिसांच्या पथकाने आरोपी फैसलला नोटीस बाजावत अटक केली आहे