Stock Market Today: दिवसभरातील चढ-उतारानंतर मंगळवारी (15 ऑक्टोबर) देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. वरच्या पातळीवर प्रॉफिट बुकींगमुळे बाजारात दबाव होता. निफ्टी 70 अंकांनी घसरून 25,057 वर बंद झाला. सेन्सेक्स 152 अंकांनी घसरून 81,820 वर बंद झाला. निफ्टी बँक 89 अंकांनी वाढून 51,906 वर बंद झाला.
सुरवातीला सेन्सेक्स सुमारे 300 अंकांच्या वाढीसह 82,251 च्या पातळीवर उघडला. निफ्टी जवळपास 80 अंकांच्या वाढीसह 25,200 च्या पातळीवर उघडला. बँक निफ्टी 140 अंकांच्या वाढीसह 51,975 च्या आसपास व्यवहार करत होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही चांगली वाढ झाली. मिडकॅपमध्ये सुमारे 140 अंकांची वाढ झाली. त्याच वेळी, स्मॉल कॅपने 100 हून अधिक अंकांची झेप घेतली होती.
निफ्टीचे सर्वाधिक वाढणारे आणि घसरणारे समभाग –
बँक निफ्टीला ICICI बँकेचा भक्कम पाठिंबा मिळाला. एनएसई निफ्टीवर बीपीसीएल, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, ब्रिटानिया, एशियन पेंटमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली गेली. तर एचडीएफसी लाइफ, विप्रो, बजाज ऑटो, बजाज फायनान्स आणि हिंदाल्को यांचे भाव घसरले.
सेन्सेक्सचे 5 सर्वाधिक वाढणारे आणि घसरलेले समभाग –
बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 9 शेअर्समध्ये वाढ झाली. यामध्ये ICICI बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 1.95 टक्क्यांची वाढ झाली आहे. यानंतर भारती एअरटेल, एशियन पेंट्स, अदानी पोर्ट्स आणि अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग 1.26 ते 0.68 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. सेन्सेक्समधील उर्वरित 21 समभाग आज घसरणीसह बंद झाले. यामध्ये बजाज फायनान्सचा समभाग 2.47 टक्क्यांनी सर्वाधिक घसरला. तर रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL), टाटा स्टील, JSW स्टील आणि टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये 0.14 टक्क्यांपासून 2.09 टक्क्यांची घसरण झाली.