Share Market Today: भारतीय शेअर बाजारात बुधवारी २८ जानेवारी रोजी सलग दुसऱ्या दिवशी जोरदार तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४८७ अंकांच्या वाढीसह ८२,३४४ वर बंद झाला, तर निफ्टीने १६७ अंकांची झेप घेत २५,३४२ चा स्तर गाठला. गुंतवणूकदारांनी कमावले 6 लाख कोटी रुपये – भारत आणि युरोपियन युनियनमधील व्यापार करार आणि जागतिक बाजारपेठेतून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह दुणावला होता. या एका दिवसाच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल ६.०६ लाख कोटी रुपयांची मोठी भर पडली असून, बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आता ४५९ लाख कोटी रुपयांच्या पार गेले आहे. निफ्टी डिफेन्स इंडेक्समध्ये ५ टक्क्यांची वाढ – Stock Market Today आजच्या व्यवहाराचे मुख्य आकर्षण संरक्षण (डिफेन्स) आणि कॅपिटल गुड्स क्षेत्रातील शेअर्स ठरले. निफ्टी डिफेन्स इंडेक्समध्ये ५ टक्क्यांची मोठी वाढ दिसून आली, तर कॅपिटल गुड्स, एनर्जी आणि पॉवर क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स ३ टक्क्यांहून अधिक वाढले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांत १.५ टक्क्यांहून अधिक वाढ बाजारात आज चौफेर खरेदीचे वातावरण होते, ज्यामध्ये मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनीही १.५ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली. केवळ एफएमसीजी आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स या क्षेत्रांत काहीशी नफावसुली झाल्याने ते निर्देशांक लाल निशाण्यात बंद झाले. सेन्सेक्समधील ३० पैकी २२ शेअर्समध्ये वाढ – कंपन्यांच्या कामगिरीचा विचार करता, सेन्सेक्समधील ३० पैकी २२ शेअर्समध्ये वाढ झाली. यामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअरने सर्वाधिक ९ टक्क्यांची वाढ नोंदवत अव्वल स्थान पटकावले. त्याखालोखाल इटरनल, बजाज फायनान्स, पॉवर ग्रिड आणि ट्रेंट या कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी सुधारणा झाली. दुसरीकडे, एशियन पेंट्सच्या शेअरला ४ टक्क्यांहून अधिक फटका बसला आणि तो ‘टॉप लूझर’ ठरला. मारुती सुझुकी, सन फार्मा आणि इन्फोसिस यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्सही घसरणीसह बंद झाले. दिवसभरात बीएसईवर एकूण ४,३७३ शेअर्समध्ये व्यवहार पार पडले, त्यापैकी २,९४५ शेअर्स वाढीसह बंद झाले तर १,२९१ शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. आजच्या व्यवहारादरम्यान ८६ शेअर्सनी आपल्या ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर २६१ शेअर्सनी आपली निचांकी पातळी गाठली. हेही वाचा – Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातानंतर उपस्थित झालेले 5 प्रश्न