शेअर बाजारातील कमाईसाठी ‘एमएसीडी’ टूल (भाग-१)

व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगबद्दल पूर्वी आपण पाहिलं परंतु सर्वसामान्यांना अशाप्रकारच्या कंपन्या शोधून त्यात योग्य भावात गुंतवणूक करणं ही एक डिफिकल्ट टास्क’ वाटते. त्यासाठी आपण टेक्निकल अॅॅनालिसिसचा आधार घेऊ शकतो. टेक्निकल अॅॅनालिसिसचा वापर करून आपण आपण शेअर्स योग्य भावात (अचूक भावात नव्हे) घेऊ शकतो व विकू देखील शकतो. योग्य भाव म्हणण्याचं कारण उदा. जर आपण ‘सर्वमान्य’ अशा एल अँड टी चं उदाहरण घेतलं, तर मागील आठवड्यात पहिल्या तिमाहीचे उत्तम रिझल्ट जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच्या शेअर्सनी सकाळच्या सत्रात तेजी अनुभवून नंतर गटांगळी खाल्ली. याला उत्तर एकच की प्रत्येक भावात शेअर्स घेणारे व विकणारे असतात व ते घेत असलेला भाव अथवा विकत असलेला भाव त्यांच्या दृष्टीनं योग्यच असतो. विकणाऱ्यास तो उच्चतम वाटतो तर घेणाऱ्यास तोच भाव न्यूनतम वाटतो. त्यामुळं ह्या हालचालींचा अभ्यास करणं जास्त महत्वाचं ठरतं. कंपनी

फंडामेंटल्सचा अभ्यास करून घेणारे लोक म्हणतात की एखाद्या चांगल्या कंपनीचा अभ्यासपूर्वक घेतलेला शेअर विकायची गरजच काय ? परंतु असेच एका चांगल्या कंपनीचं उदाहरण द्यावंसं वाटतं ते म्हणजे, टाटा मोटर्स. आठ दहा महिन्यांपूर्वी अनेकांनी ह्या कंपनीचे शेअर्स अभ्यासपूर्वक 450-500 रुपयांमध्ये घेतले व तो शेअर 598 रुपयांपर्यंत गेला देखील. परंतु ‘दीर्घमुदतीसाठी’ असा शिक्का मारलेल्यांनी तो न विकता आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवून दिला व आज तोच शेअर आपणांस 260 रु. च्या आसपास उपलब्ध आहे. त्यामुळं काही साधंनाद्वारे आपण योग्य प्रकारे शेअर्स खरेदी व विक्री करू शकतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शेअर बाजारातील कमाईसाठी ‘एमएसीडी’ टूल (भाग-२)

बाजारासंबंधी किंवा कंपनीच्या बाबतीतील कोणत्याही घडामोडीअगोदर त्याचे प्रतिबिंब हे त्या शेअर्सच्या भावात पडते व ते आपल्याला टेक्निकल अॅॅनालिसिसचे काही टूल्स वापरून ओळखता येऊ शकते. टेक्निकल अॅॅनालिसिस मधील सर्वांत जास्त वापरलं जाणारं टूल म्हणजे एमएसीडी (MCD) म्हणजेच मूव्हींग अॅॅव्हरेज कन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स. याचा उपयोग कसा करावयाचा ते पाहू.. यात प्रामुख्यानं एक रेषा ही MCD असते तर दुसऱ्या रेषेस सिग्नल लाईन म्हणतात. लाईन, जर सिग्नल लाईनला छेदून वरती गेली तर पॉझिटिव्ह क्रॉसओव्हर हा तेजीकडं इशारा करतो, तर निगेटिव्ह क्रॉसओव्हर विक्रीकडं. आता पाहू डायव्हर्जन्स म्हणजे काय ? तर, शेअरच्या किमतीत व रेषेमधील तफावत. उदा. जर एखाद्या शेअरचा भाव वाढतोय परंतु खालावतोय याचा सूचक अर्थ म्हणजे कोठेतरी त्या शेअर्समधील तेजीचा शेवट जवळ आलाय. आता केवळ याच टूलच्या आधारे शेअरची खरेदी विक्री करणं जोखमीचं ठरू शकतं किंवा हे एकच साधन खरेदीसाठी पुरेसं ठरू शकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)