शेअर बाजारातील कमाईसाठी ‘एमएसीडी’ टूल (भाग-२)

शेअर बाजारातील कमाईसाठी ‘एमएसीडी’ टूल (भाग-१)

आरएसआय (RSI) म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स हे टूल फार महत्वाचं ठरतं. हे देखील सर्वसाधारणपणे प्रत्येक आलेखात उपलब्ध असतं. हे साधन आपणांस कोणत्याही शेअरचा भाव हा ओव्हरबॉट (खूप वधारलेला बाजारभाव) अथवा ओव्हरसोल्ड (खूप खालावलेला बाजारभाव) याबाबत सूचना देतो. या साधनात आलेखावर 0 ते 100 अशा किमती ठरलेल्या असतात जर ठडख चा आलेख हा 70 च्या वरती असेल तर तो शेअर ओव्हरबॉट म्हणजे तूर्त खरेदीस धोकादायक असा इशारा होतो व जर RSI चा आलेख हा 30 च्या खाली असेल तर तो शेअर हा खरेदी करण्यास तत्वतः पूरकता दर्शवतो. यात देखील अधिक अचूकतेसाठी दोन सरासरी गृहीत धरता येऊ शकतात, (जर आपण वापरत असलेल्या आलेखावर उपलब्ध असल्यास 9 व 14 यां सरासरी वापराव्यात) जर 30 किंमतीच्या खालील भागात क्रॉसओव्हर असेल व त्याच सुमारास चआलेखावर देखील पॉझिटिव्ह क्रॉसओव्हर झाला असेल तर तो शेअर खरेदीस उपयुक्त समजावा व परिस्थिती अगदी याच्या उलट असेल तर त्या शेअरचा भाव येणाऱ्या काळात खाली येऊ शकेल असं समजावं. सर्वांत महत्वाचं म्हणजे वर दिलेली साधने ही दैनिक आलेखावर वापरण्यासाठी सुचवलेली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मागील आठवड्यात निफ्टी 10,860 या पातळीवर बंद झाल्यास निफ्टीमध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे, असे म्हटले होते. त्याप्रमाणे 10 जुलै रोजी निफ्टी 50 ही त्या पातळीच्या वर म्हणजे 10,947.25 ला बंद झाली व तिनं दैनिक आलेखावर ट्रेंडलाईन ब्रेकआऊट दिले. त्यानंतर तिची उर्ध्व दिशेतील वाढ सुरूच असून मागील आठवड्याच्या शेवटास 11278.35 ह्या तिच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च भावावर बंद झाली.

जागतिक घडामोडींच्या अनुषंगाने मार्केटमध्ये लागलीच काही प्रेरणादायी नसताना, याउलट कच्च्या तेलाच्या किमती, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत घसरणारा रुपया, अमेरिका व चीन यांच्यातील धुमसत असलेले ट्रेडवॉर व आपली वाढती महागाई, इ.निराशाजनक गोष्टीच जास्त असताना फक्त टेक्निकल अॅॅनालिसिसच्या अभ्यासाद्वारे बाजाराची दिशा ओळखता येऊ शकते हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले, मात्र त्याच गोष्टींच्या अभ्यासानुसार योग्य वेळी बाजारातील कलबदल देखील ओळखता येणं गरजेचं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)