Share Market: आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह बंद झाले. बुधवारी, आयटी आणि बँकिंग समभागांमध्ये जोरदार खरेदी झाली. सकारात्मक जागतिक ट्रेंडमुळे बेंचमार्क सेन्सेक्स सुमारे 567 अंकांनी वाढला आणि निफ्टी पुन्हा 23,150 च्या पातळीवर पोहोचला.
इन्फोसिस, टीसीएस आणि एचडीएफसी बँकेच्या वाढीमुळे बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स 566.63 अंकांनी किंवा 0.75 टक्क्यांनी वाढून 76404.99 वर बंद झाला. दिवसाच्या व्यवहारात बेंचमार्क 624.77 अंकांनी किंवा 0.82 टक्क्यांनी वाढून 76,463.13 च्या उच्चांकावर पोहोचला होता. NSE निफ्टी 130.70 अंकांनी किंवा 0.57 टक्क्यांनी वाढून 23,155.35 वर बंद झाला. इंट्राडे सत्रात, NSE वर निफ्टी 144.9 अंकांनी किंवा 0.63 टक्क्यांनी वाढून 23,169.55 वर पोहोचला होता.