सलग आठव्या दिवशी निर्देशांकांत झाली घट

मुंबई – अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्ध आणि देशातील निवडणुकांच्या रणधुमाळीमुळे शेअरबाजारात विक्रीचे वातावरण कायम आहे. त्यामुळे शुक्रवारी सलग आठव्या दिवशी शेअरबाजाराचे निर्देशांक घसरले.

बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 95 अंकांनी कमी होऊन 37,462 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक 22 अंकांनी कमी होऊन 11,278 अंकांवर बंद झाला. सरलेल्या पूर्ण आठवड्यात सेन्सेक्‍स एक 1,500 अंकांनी म्हणजे 3.85 टक्‍क्‍यांनी तर निफ्टी 433 अंकांनी कोसळला आहे.

अमेरिकेने चीनमधून होणाऱ्या 200 अब्ज डॉलरच्या आयातीवरील शुल्क 10 टक्‍क्‍यांवरून 25 टक्‍के केले आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत गेल्या एक आठवड्यापासून उलथापालथ झाली आहे. शुक्रवारी झालेल्या विक्रीचा फटका माहिती-तंत्रज्ञान, तेल आणि नैसर्गिक वायू आणि तंत्रज्ञान कंपन्यांना बसून या क्षेत्रांचे निर्देशांक 1.54 टक्‍क्‍यापर्यंत कोसळले. मात्र बॅंकिंग आणि ग्राहक वस्तु क्षेत्राचे निर्देशांक 1.51 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)