शेअर निर्देशांकांची जोरदार घोडदौड चालूच

मुंबई (दि. 19) – शेअरबाजार निर्देशांक सध्या उच्च पातळीवर असल्यामुळे बरेच गुंतवणूकदार नफा काढून घेत आहेत. मात्र दीर्घ पल्ल्यात भारतीय शेअरबाजारातून अधिक परतावा मिळेल असा आशावाद कायम असलेले गुंतवणूकदार मोठी खरेदी करीत आहेत. परिणामी भारतीय शेअरबाजाराचा निर्देशांक आगेकूच करीत आहेत. मंगळवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 268 अंकांनी वाढून 38363 अंकांवर बंद झाला. गेल्या 6 सत्रात सेन्सेक्‍स 1420 अंकांनी वाढला आहे. मंगळवारी राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक 70 अंकांनी वाढून 11532 अंकांवर बंद झाला.

एम्के मालमत्ता व्यवस्थापन संस्थेचे संशोधन प्रमुख जोसेफ फॉर्मस यांनी सांगितले की, देशात आणि परदेशात भांडवल सुलभता आहे, रुपया स्थिर झाला आहे, कमी-अधिक प्रमाणात जागतिक शेअरबाजाराचे निर्देशांक वाढत आहेत. या कारणामुळे भारतीय शेअरबाजाराचे निर्देशांक आगेकूच करीत आहेत. मंगळवारी सरकारी कंपन्यांचा निर्देशांक 1.88 टक्‍क्‍यांनी, ऊर्जा क्षेत्राचा निर्देशांक

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

1.32 टक्‍क्‍यांनी, एफएमसीजी क्षेत्राचा निर्देशांक 1.14 टक्‍क्‍यांनी, तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचा निर्देशांक 1.0 टक्‍क्‍यांनी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा निर्देशांक 0.94 टक्‍क्‍यांनी, बॅंकिंग क्षेत्राचा निर्देशांक 0.62 टक्‍क्‍यांनी, तर ग्राहक वस्तू क्षेत्राचा निर्देशांक 0.62 टक्‍क्‍यांनी वाढला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)