मुंबई – रशिया-युक्रेन युद्धाच्या झळा शेअर बाजाराला बसल्या आहेत. युद्धास सुरुवात झाली तेव्हापासून शेअर बाजारात मोठी घसरण बघायला मिळाली आहे. मात्र आज दिवसाच्या सुरुवातीलाच शेअर बाजारातील हे युद्ध काहीप्रमाणात थांबल्याचे दिसून येत आहे. शेअर बाजारासाठी आजची सुरुवात चांगली दिसून येत आहे. सततच्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात वेगाने व्यवहार होताना दिसत आहेत.
BSE सेन्सेक्स 452 अंकांच्या उसळीसह 55921 वर उघडला आणि आज निफ्टीने 117.20 अंकांच्या चांगल्या वाढीसह 16723 च्या पातळीवर व्यवहार सुरू केला आहे.
NSE चा निफ्टी आज 117.20 अंकांच्या चांगल्या वाढीसह 16723 च्या पातळीवर प्री-ओपन ट्रेड करताना दिसत आहे आणि BSE सेन्सेक्स 452 अंकांच्या उसळीसह 55921 वर व्यापार करत आहे.
आठवड्यातील चौथ्या दिवशी गुरुवारी शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात झाली आहे. शेअर बाजार सुरुझाल्यानंतर दोन्ही निर्देशांकांनी उच्चांकी सुरुवात केली. सध्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 297 अंकांच्या वाढीसह 55,766 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. यासोबतच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही 55 अंकांच्या वाढीसह 16671 वर व्यवहार करत आहे.
विशेष म्हणजे आठवड्याच्या बुधवारी शेअर बाजार कोसळला आणि दिवसभराच्या व्यवहारानंतर घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 778 अंकांनी घसरून 55,469 वर, तर निफ्टी निर्देशांक 188 अंकांनी घसरून 16,606 वर बंद झाला.