निर्देशांकांत अल्प सुधारणा

मुंबई – जागतिक व्यापारयुद्ध, क्रूड तेलाचे वाढत असलेले भाव, अस्थिर रुपया, फेडरल रिझर्व्हचे लवकरच जाहीर होणार असलेले पतधोरण, कमकुवत मान्सून, पंधरा दिवसांनंतर जाहीर होणारा अर्थसंकल्प इत्यादी कारणांमुळे गुंतवणूकदार सावध आहेत. त्यामुळे मंगळवारी खरेदी-विक्रीच्या बऱ्याच लाटा येऊन गेल्यानंतर निर्देशांकांत थोडीफार सुधारणा होऊ शकली.

चार दिवसांत शेअर निर्देशांक घसरले होते. मंगळवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 85 अंकांनी वाढून 39,046 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 19 अंकांनी वाढून 11,691 अंकांवर बंद झाला. आज दिवसभर विक्रीचे वातावरण होते. मात्र, बाजार बंद होताना थोडीफार खरेदी झाली. तेल आणि नैसर्गिक वायू, तंत्रज्ञान या क्षेत्राचे निर्देशांक थोडेफार वाढले. तर आरोग्य, वाहन, ग्राहक वस्तू क्षेत्राचे निर्देशांक कमी झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.