श्री शारदा गजाननाची विसर्जन मिरवणूक शांतीरथातून निघणार

पुणे: अखिल मंडई मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला यंदा सायंकाळी 7 वाजता सुरूवात होणार आहे. पुण्याच्या गणेशोत्सवात प्रथमच विसर्जन मिरवणुकीच्या इतिहासात भगवान महावीर यांचा “अहिंसा परमो धर्म’ असा शांतीचा संदेश देत “शांती रथात’ शारदा-गजानन विराजमान होणार आहेत.

यासह 15 फूट भगवान महावीरांची मूर्ती हे यंदाच्या रथाचे वैशिष्ट्य आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली. शांती रथाची उंची 32 फूट आहे. नवकार मंत्रांचा समावेश रथात असणार आहे. त्याचबरोबर भगवान महावीरांच्या आईला पडलेली 14 स्वप्ने देखील रथात साकारण्यात आली आहेत. आकर्षक एलईडी लाईट इफेक्‍टस आणि विविधरंगी फुलांची सजावट रथाला करण्यात येणार आहे. या रथाची संकल्पना शिल्पकार विशाल ताजणेकर यांची आहे.

शिवगर्जना, रमणबाग ही ढोल-ताशा पथके आणि न्यू गंधर्व ब्रास बॅन्ड मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. खळदकर बंधूचे सनईवादन होणार आहे, असेही थोरात यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.