शारदा चिटफंड प्रकरण : सीबीआय चौकशीवर न्यायालयाच्या देखरेखेची मागणी फेटाळली

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगाल मधील शारदा चिट फंड गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयची सध्या जी चौकशी सुरू आहे त्यावर न्यायालयीन देखरेखेसाठी समिती नेमण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सन 2013 सालीच या प्रकरणाची चौकशीन्यायालयाने सीबीआयकडे सोपवली आहे पण अजून त्यांची चौकशी पुर्ण झालेली नाही. त्यामुळे ही चौकशी वेगाने व्हावी यासाठी न्यायालयाच्या देखरेखेखाली ही चौकशी केली जावी अशी मागणी करणारी याचिका काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे.

शारदा चिट फंड घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी आयपीएस आधिकारी राजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक एसआयटी नेमण्यात आली होती. त्या एसआयटीने गुन्हेगारांनाच पाठिशी घालण्याचे काम केले आहे असा आरोप सीबीआयकडून करण्यात आला होता व त्या अनुषंगाने सीबीआयने राजीवकुमार यांच्यावर छापा घालण्याचा प्रयत्न केला होता. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर न्यायालय काय निर्णय देते आहे या विषयी औत्स्युक्‍य होते.

Leave A Reply

Your email address will not be published.