मस्कत – भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू अचंत शरत कमल याने रविवारी ओमान ओपन आयटीटीएफ चॅलेजर टेबल टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शरतने चौथ्या मानांकित रूसच्या किरिल स्काचकोव यांचा 11-13, 11-13, 13-11, 11-9, 13-11, 8-11, 11-7 असा पराभव करत विजय नोंदविला. ही लढत 1 तास 8 मिनिटे चालली.
आता अंतिम फेरीत शरत कमल समोर पुर्तगालच्या मार्कोस फ्रेटास यांचे आव्हान असणार आहे. मार्कोस फ्रेटासने भारताच्या हरमीत देसाईचा 5-11, 11-9, 6-11, 6-11, 11-8, 13-11, 11-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
दरम्यान, दुसरीकडे याच स्पर्धेत भारताच्या युवा टेबल टेनिसपटू जीत चंद्राने 21 वर्षाखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले आहे. स्पर्धेतील 21 वर्षाखालील मुलांच्या अंतिम लढतीत जीत चंद्राने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या मानव ठक्करला 11-6,117-7,13-11 असे पराभूत केले आणि विजेतेपदाला गणवसणी घातली.