सीरम इन्स्टिट्यूटला शरद पवारांची भेट

पुणे – करोना प्रतिबंधात्मक लस कधी येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्‍सफर्डसोबत मिळून तयार केलेल्या लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी शनिवारी सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली.

इंग्लंडमधील ऑक्‍सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या करोना लसीची मानवी चाचणी सुरू आहे. त्याचप्रमाणे सीरम इन्स्टिट्यूटही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात देशातील दीड हजार व्यक्तींवर या लसीची चाचणी करणार आहे. ही लस नागरिकांना परवडेल एवढ्या किंमतीला देण्याचा मानस आहे, असे आदर पूनावाला यांनी याआधीच स्पष्ट केले आहे.

दरम्यान, लसीची प्रगती कुठपर्यंत आली आहे, याची माहिती घेण्यासाठी खासदार शरद पवार हे सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आले होते. त्यांनी सायरस पूनावाला आणि आदर पूनावाला यांची भेट घेऊन लसीबाबत चर्चा केली, असे सूत्रांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.