शरद पवारांच्या संघर्षाला नियतीचाच आशिर्वाद

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे अमित शहांना उत्तर

जालना : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पाश्वभूमीवर भाजपा-शिवसेनेचा वारू चारही बाजूने उधळला आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून अनेक वजनदार नेते बाहेर पडून भाजपा वा शिवसेनेत दाखल होत आहेत. दरम्यान, आता शरद पवारांच्या संघर्षाला नियतीचाच आशिर्वाद आहे, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांना सडेतोड उत्तर दिले आहे. काही दिवसांपुर्वी अमित शहांनी पवारांनी काय केले असा सवाल केला होत त्यालाच मुंडेंनी आज उत्तर दिले.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा महाराष्ट्रभर दौरा सुरू आहे, आणि तो महत्त्वपूर्ण मानला जात आहे. दरम्यान, शरद पवार आज जालन्यात उपस्थित आहेत. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, पवारांच्या पायगुनानंतर मराठवाड्यात पाऊस बरसला आहे. पवारांच्या संघर्षाला नियतीचा आशीर्वाद आहे. पवार साहेबांनी महाराष्ट्रात जेवढी विमानतळे केली तेवढी गुजरातमध्ये बसस्टॅण्ड सुद्धा नाहीत अशा शब्दांत धनंजय मुंडेंनी भाजपचे अध्यक्ष अमित शहांवर हल्लाबोल केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत राष्ट्रवादी कधीही संपणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.