शरद पवारांची गुरुवारी मंचरमध्ये सभा

मंचर – शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्टवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आय मित्र पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांच्या प्रचारार्थ राष्टवादी कॉग्रेस पक्षाचे राष्टीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहिर सभा गुरुवारी (दि. 25) रोजी मंचर येथील रामनगरी मैदानावर सायंकाळी 4 वाजता होणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णु हिंगे पाटील यांनी दिली.

या सभेसाठी मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, कॉंग्रेस आय, शेतकरी कामगार पक्ष, आर. पी. आय (कवाडे गट, गवई गट, साळवे गट, खोब्रागडे गट), स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्रपक्षाचे राज्यातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहे. शेतकरी, व्यापारी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांची जाण असणारे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार सध्याच्या शेतकरी विरोधी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काय बोलणार, याबाबत मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे सभेसाठी विक्रमी गर्दी होईल. यासाठी सर्व नियोजन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. युवक -युवतींसह शेतकरी या सभेला उपस्थित राहणार आहेत. राष्टवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस आय व मित्रपक्षाचे स्टार प्रचारकाच्या तोफा येथे धडाडणार आहेत, अशी माहिती राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांचे प्रतिनिधी देवदत्त निकम यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.