नवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दांडी मारली होती. पवारांनी पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यास अनुपस्थिती दर्शविल्यानंतर, त्यांना पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यामध्ये पाचव्या रांगेमध्ये स्थान देण्यात आल्याने त्यांनी दिल्लीमध्ये असताना देखील या सोहळ्यास उपस्थिती लावणे टाळले अशा आशयाच्या बातम्या देखील माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी, ‘देशाच्या राजकारणातील जेष्ठ नेत्याला अशाप्रकारची वागणूक देत भाजप सरकार द्वेषाचे राजकारण खेळत आहे.’ असा आरोप लावला होता.
मात्र अशातच आता, या प्रकरणी राष्ट्रपती भावनाकडून खुलासा प्रसिद्ध करण्यात आला असून शरद पवारांना पाचव्या नव्हे तर पहिल्याच रांगेत स्थान दिलं होतं असं राष्ट्रपती भावनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राष्ट्रपतींचे माध्यम सचिव अशोक मलिक यांनी याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे माहिती दिली असून ते म्हणतात, “३० मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या शपथग्रहण सोहळ्यामध्ये शरद पवार यांना व्हीव्हीआयपी लोकांसाठीच्या बैठकव्यवस्थेमध्ये स्थान देण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावणाऱ्या वरिष्ठ पाहुण्यांसाठी जी आसनव्यवस्था केली होती त्यातील सर्वात पुढील म्हणजेच पहिल्या ओळीमध्ये शरद पवार यांचे आसन होते. बहुतेक पवारांच्या ऑफिसमधील अधिकाऱ्यांनी व्हीव्हीआयपींसाठी वापरण्यात आलेल्या V या अक्षराचा अर्थ रोमन अंक V म्हणजेच ५ असा काढला असावा.”
At the swearing-in ceremony on May 30, Mr Sharad Pawar was invited to the "V section", where the most senior guests sat. Even within "V", he had a labelled first row seat. Somebody in his office may have confused V (for VVIP) for the Roman V (five) https://t.co/pY6WaqlfQ3
— Ashok Malik (@MalikAshok) June 5, 2019