शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी प्रयन्त करणार- शरद पवार

प्रातिनिधिक छायाचित्र

इंदापूर: शेतकऱ्यांच्या सरसकट कर्ज माफीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आग्रह धरणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोर जावं लागलं. त्यामुळे शरद पवारांनी पुन्हा एकदा गावोगावी जाऊन माणसे जोडण्यास सुरवात केली आहे.

शरद पवार दृष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर रवाना झाले असून त्यांनी आज इंदापूर भागातील गांवाना भेटी दिल्या. दरम्यान, शरद पवार म्हणाले दुष्काळाची स्थिती कठिण आहे. शेतकरी संकटात आहे. यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी भेटणार असून महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here