पिंपरी- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक भोसरीत पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष ‘शरद पवार’ देखील उपस्थित होते. दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलत असताना ‘प्रचार कसा करायचा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांकडून शिका’ असा सल्ला पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना यावेळी दिला.
मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या पराभवानंतर शरद पवारांनी पहिल्यांदाच पिंपरीतल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.