मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे राजकारणातील जेष्ठ नेते आहेत. आयुष्यातील ५० वर्षे सक्रिय समाजकारण करणाऱ्या पवारांचे राजकारणात एक वेगळे स्थान आहे. शरद पवार यांनी केलेल्या प्रत्येक वक्तव्यांचे राजकारणात दीर्घकालीन परिणाम दिसून येतात. २००४ साली पवारांना कॅन्सरचं निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तुमच्याकडे केवळ सहा महिने असल्याचे पवारांना सांगितले होते त्यावर पवारांनी त्या डॉक्टरसोबत पैज देखील लावली होती. मराठवाडा कॅन्सर हॉस्पीटलच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना स्वतः पवारांनी याबाबतचा एक किस्सा सांगितला आहे.
कॅन्सरचे निदान झाल्यानंतर शरद पवार यांना डॉक्टरांनी त्यांची काही कामे शिल्लक असतील तर करून घेण्यास सांगितले. पवारांना मात्र काही समजले नाही त्यावर डॉक्टरांनी स्पष्ट सांगत, “तुमच्याकडे केवळ सहा महिने असलयाचे सांगितले”. त्यावर पवार यांनी ‘मी काही इतक्यात जात नाही” असं म्हणत थेट डॉक्टरांशीच पैज लावली.
पवार फक्त पैज लावूनच थांबले नाहीत तर अगदी तू म्हणत अशील तर तुला पोहचवल्यावरच मी जाईल असा टोमणा देखील डॉक्टरला मारला. हा किस्सा स्वतः पवारांनी मराठवाडा कॅन्सर हॉस्पीटलच्या उद्घाटनाप्रसंगी सांगितला. २००४ साली हा किस्सा घडला सध्या २०२२ सुरु आहे आणि पवारही त्याच ऊर्जेने काम करताना दिसून येताहेत. त्यामुळे एरवी राजकारणात विरोधकांनाही मात देणाऱ्या पवारांनी २००४ मध्ये लावलेली पैज जिंकल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत.